loader
Breaking News
Breaking News
Foto

देवरुखच्या कलाकारांची चित्रे अप्रतिम, रत्नागिरी तारांगणमध्ये याचे प्रदर्शन मोफत भरवू - आमदार किरण सामंत

देवळे (प्रकाश चाळके) - देवरुख येथे सरस्वती ॲकॅडमीने प्रभाकर सनगरे यांनी देवरुख मधील चित्रकारांना प्रदर्शन भरवून चांगले व्यासपीठ मिळवून दिले आहे. या प्रदर्शनात सहभागी झालेले कलाकार प्रवीण हर्डीकर, सुरेंद्र उर्फ भाऊ शिंदे , कुमार भाट्ये, दिक्षा सागवेकर यांची चित्रे अप्रतिम आहेत. या चित्रांना आपण जिल्हाठिकाणी तारांगणमध्ये मोफत प्रदर्शन भरवून हि कला सर्वदूर पोहचवण्याचे काम करु अशी ग्वाही आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी दिली. देवरुख भेटीत किरण सामंत यांनी आवर्जून प्रदर्शनाला भेट देवून कलाकारांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. यावेळी माजी जि.प.अध्यक्ष रोहन बने, राजेंद्र महाडीक, माजी नगरसेवक वैभव पवार, बाबु मोरे, बापु शिंदे, विलास मोरे, रोहन हर्डीकर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी राजेंद्र महाडीक यांनी या कलाकारांच्या कलाकृतीची विक्री व्यवस्थेसाठी आपण प्रयत्न करु असे सांगितले. रोहन बने यांनी देवरूख मधील या कलाकारांसाठी जी लागेल ती मदत आपण करु असे सांगत अशा कलाकारांचा योग्य तो सन्मान झाला पाहीजे असे मत व्यक्त केले. या प्रदर्शनाला जिल्हाभरातून कलारसिकांनी चांगला प्रतिसाद दिला. चित्रकारांची चित्रे विकत घेवून कलाकारांना प्रोत्साहन दिले. देवरुख कलाकारांनी मान्यवरांनी दिलेल्या भेटीबाबत कृतज्ञता व्यक्त केली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg