loader
Breaking News
Breaking News
Foto

माळवाशी परिसरातील वारकरी पंढरपूर वारीला रवाना

देवळे /प्रकाश चाळके : "विठ्ठल- विठ्ठल, जय हरी विठ्ठल... रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी" अशा जयघोषात व भक्तीमय वातावरणात संगमेश्वर तालुक्यातील माळवाशी येथील वारकरी पंढरपूर वारीला रवाना झाले. 29 रोजी सकाळी माळवाशी शाळेजवळ या बससेवेचा शुभारंभ कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत देवरूख येथे झाला. यावेळी गावचे उपसरपंच सुनील सावंत, चंद्रकांत कडू, बळीराम गुरव, बाळकृष्ण पांडुरंग करंडे, रमेश जौरत, सदानंद कडू, बाळकृष्ण सखाराम करंडे, बावा जौरत, महेंद्र कडू यांच्यासह माळवाशी परिसरातील वारकरी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या वारीबाबत बोलताना ह.भ.प. सदानंद कडू महाराज यांनी सांगितले की, ओम आदिनाथ सांप्रदाय ऐक्यवर्धक शिष्टमंडळाच्यावतीने मागील अनेक वर्षांपासून पंढरपूर वारीचे आयोजन केले जाते. दरवर्षी शेतीची कामे आटपून हा शेतकरी व कष्टकरी वर्ग या वारीत सहभागी होतो. कार्तिकी एकादशीपर्यंत पंढरपूर येथे हे वारकरी राहतात. त्यानंतर गावी येऊन गंगापूजन करतात. मागील अनेक वर्षांपासून हा हरिनामाचा जागर या माळवाशी गावात सुरू आहे, असे कडू महाराज म्हणाले.

टाइम्स स्पेशल

या उद्घाटनावेळी सुनील सावंत म्हणाले की, मागील अनेक वर्षांपासून या माळवाशी गावाला वारीची परंपरा आहे. या वारीत ज्येष्ठ नागरिकांसह तरूण पिढीही सहभागी होते. आजूबाजूच्या गावातील वारकरी या वारीत सहभागी होतात. हरिनामात रंगण्याचा हा सोहळा मनाला समाधान देतो, असे सावंत म्हणाले. सोमाआबा जौरत, जौरत गुरुजी, पांडुरंग पवार, मनोहर सावंत, दिलीप करंडे यांनी या वारीला शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg