loader
Breaking News
Breaking News
Foto

मीरा रोड येथे विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा जनजागृती व अभ्यास दौरा

ठाणे (प्रतिनिधी) - रस्ता अपघातांची वाढती संख्या आणि वाहतुकीतील बेफिकिरी लक्षात घेता लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक शिस्तीची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, मीरा-भाईंदर यांच्या वतीने मिरा रोड (पूर्व) येथील स्व. गिल्बर्ट जॉन मेंडोसा ट्रॅफिक पार्क येथे रस्ता सुरक्षा जनजागृती व अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मीरा-भाईंदर परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनुसार प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून रस्ता सुरक्षा, वाहतूक चिन्हे, सिग्नल पालन, तसेच शिस्तबद्ध वाहनचालना याबाबत प्रात्यक्षिक स्वरूपात मार्गदर्शन करण्यात आले. वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेटचा वापर आणि पादचारी सुरक्षेचे महत्त्व त्यांनी या माध्यमातून आत्मसात केले असल्याची माहिती सहाय्यक परिवहन अधिकारी प्रसाद नलवडे यांनी दिली.

टाइम्स स्पेशल

विद्यार्थ्यांनी या अभ्यास दौर्‍यात उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून सुरक्षित वाहनचालना करण्याचे ज्ञान मिळवले. पालक व शिक्षकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत वाहतूक शिस्तीचे शिक्षण शाळास्तरावरूनच देण्याची गरज असल्याचे सांगितले. यासाठी सहाय्यक परिवहन अधिकारी प्रसाद नलवडे,मोटर वाहन निरीक्षक प्रशांत दराडे भूषण लोहार आदींनी अथक परिश्रम घेतले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg