loader
Breaking News
Breaking News
Foto

नाल्यामध्ये अजगर आढळला, अजगराची सुखरूप सुटका

ठाणे (प्रतिनिधी) - ठाण्यात सावरकर नगर, येथील नाल्यामध्ये एक सुमारे ०८ फूट लांबीचा अजगर आढळल्याने एकच खळबळ उडाली सदर अजगराला WWA (Wild Welfare Association) कर्मचाऱ्यांच्या ताब्यात घेऊन त्याला सुरक्षित स्थळी हलविले आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार ठाण्यात मराठा गल्ली, कामगार नाक्याजवळ, आर.जे. ठाकूर कॉलेज समोर, नाल्यात एक अजगर आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१-पिकअप वाहनासह, WWA (Wild Welfare Association) कोकणी पाडा येथील कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान ०१-इमर्जन्सी वाहनासह उपस्थित होते. सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही. सदर घटनास्थळी नाल्यामध्ये आढळलेल्या अजगराची सुखरूप सुटका करण्यात आली असून, त्याला जंगलात सोडण्यात आले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg