loader
Breaking News
Breaking News
Foto

किल्ले सिंधुदुर्ग नजीकच्या खडकाळ भागात आढळला भल्यामोठ्या शार्क माशाचा सांगाडा

मालवण (प्रतिनिधी) - मालवणच्या समुद्रातील किल्ले सिंधुदुर्ग नजीकच्या खडकाळ भागात आज सकाळी भलामोठा शार्क माशाचा कुजलेल्या अवस्थेतील सांगाडा अडकला असल्याचे दिसून आले. मात्र समुद्र खवळलेला असल्याने संबंधित यंत्रणेला तेथपर्यंत पोचणे कठीण बनले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

समुद्रातील वादळ सदृश परिस्थितीमुळे गेले काही दिवस किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. काल रात्री मुसळधार पाऊस कोसळला. समुद्राला आलेल्या उधाणात मध्यरात्री किल्ले सिंधुदुर्ग लगतच्या खडकाळ भागात एक भलामोठा कुजलेल्या अवस्थेतील शार्क माशाचा सांगाडा अडकला. आज सकाळी किल्ल्यातील स्थानिक रहिवासी व किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होडी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांना हा माशाचा सांगाडा दिसून आला. सुमारे १५ ते १७ फूट लांबीचा हा मासा असून तो पूर्णतः कुजला आहे. माशाचा तोंडाचा भाग अस्तित्वात नाही तर अन्य भागाचा सांगाडा व मांस असल्याचे दिसून येत आहे. सध्या समुद्र खवळलेला आहे. त्यामुळे या माशाची विल्हेवाट लावण्यास संबंधित यंत्रणा तेथपर्यंत पोचणे कठीण आहे. समुद्राला पुन्हा उधाण आल्यास हा सांगाडा पुन्हा समुद्रात वाहून जाण्याची शक्यताही श्री. सावंत यांनी वर्तविली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg