loader
Breaking News
Breaking News
Foto

वडद सुतारवाडीतील ग्रामस्थांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील वडद सुतारवाडीतील महिला, पुरुषांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांना प्रेरित होऊन गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश कार्यक्रम वडद सुतारवाडीतील सभागृहात पार पडला. यावेळी मनसे वडद शाखेच्या अध्यक्षपदी प्राणेश पिंपळकर यांची तर राजेंद्र पिंपळकर यांची उपशाखाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. प्रमोद गांधी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर, तालुका अध्यक्ष सुनिल हळदणकर, उपतालुका अध्यक्ष जितेंद्र साळवी, अमित खांडेकर, सुजित गांधी, सुशांत कोळंबेकर उपस्थित होते. या पक्ष प्रवेश कार्यक्रमात अजय पिंपळकर, दत्ताराम पिंपळकर, प्रसाद पिंपळकर, उमेश पिंपळकर, अजित पिंपळकर, प्रमोद पिंपळकर, अशोक पिंपळकर, वासुदेव पिंपळकर, सचिन पिंपळकर, दीपक पिंपळकर, योगेश पिंपळकर, प्रिया पिंपळकर, मानसी पिंपळकर, भाग्यश्री पिंपळकर, रेखा पिंपळकर, कल्पना पिंपळकर, आरोही पिंपळकर आदींसह ग्रामस्थ, महिला उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg