loader
Breaking News
Breaking News
Foto

बोरज येथे घरफोडी, आरोपींविरोधात गुन्हा दाखल!

खेड : - तालुक्यातील बोरज येथे दोन चोरट्यांनी घरफोडी करून रोख रुपये पंचवीस हजार घेऊन पोबारा केला आहे. हि घटना दि. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३:३० च्या दरम्यान घडली असून फिर्यादी संदीप बाळकृष्ण जाधव (वय-५० वर्षे, सध्या रा. बोरज- सुरभी गार्डन, ता. खेड, मूळ रा. कात्रोली - देऊळवाडी, ता. चिपळूण) यांनी येथील पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केल्यानुसार पोलीसांनी संशयित आरोपी महेंद्र राजाराम प्रिदाणकर (रा. मोरवंडे - कुंभारवाडी, ता. खेड) व एक अनोळखी इसम अशा दोघांविरोधात गुन्हा रजि.नं. ३२७/२०२५, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३३१ (३), ३०५ (अ), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. खेड पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप बाळकृष्ण जाधव यांचे चुलते प्रकाश मुलु जाधव यांच्या बोरज येशील बंगल्याचे मुख्य दरवाजाचे कडी कोयंडा संशयित आरोपी महेंद्र राजाराम प्रिंदाणकर व त्याच्यासोबत असलेला अनोळखी इसम यांनी कोणत्यातरी हत्याराने तोडून आतमध्ये प्रवेश करून घरातील कपाटामध्ये ठेवलेली २५ हजार रुपयांची रोख रक्कम चोरुन नेली. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg