loader
Breaking News
Breaking News
Foto

समाजभूषण पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर यांचा वाढदिवस विविध सेवाभावी उपक्रमांनी साजरा

कणकवली ( प्रतिनिधी) - जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद अंगीकारुन जिल्ह्यातील जनतेची सेवा करणार आहे.प्राण जीवन सहयोग संस्थेच्या माध्यमातून जनसेवेचे व्रत यापुढे ही अखंडपणे जोपासणार आहे.असे प्रतिपादन प्राण जीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष तथा समाजभूषण पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर यांनी पणदुर संविता आश्रम येथे बुधवारी आयोजित कार्यक्रमात केले.‌ यावेळी व्यासपीठावर, संविता आश्रम चे उपव्यवस्थापक आशिष कांबळी, भक्ती परब, सुवर्णा रावराणे, शिरवल गावचे उपसरपंच प्रवीण तांबे, राजन चव्हाण, प्राण जीवन सहयोग संस्थेचे उपाध्यक्ष स्वप्नील पूजारे, शिरवल उपसरपंच प्रवीण तांबे, माजी सरपंच मनोज राणे, चेतन शिरवलकर, तुळशीदास कुडतरकर, श्रीकृष्णा यादव, अनिप सावंत, मंगेश तांबे, सिद्धेश शेलार, सूरज सावंत, रमाकांत पुजारे, अंकित साटम, ,साईल चव्हाण, गुरुनाथ चौकेकर, चेतन शिरवलकर, श्रद्धा यादव, शनया चौकेकर, छाया गावडे आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना चौकेकर म्हणाले की, जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम पणदुर चे अध्यक्ष संदीप परब आणि त्यांच्या टीमने रस्त्यावरील वंचित, निराधार, वयोवृद्ध, मानसिक रुग्ण यांना आश्रमाच्या माध्यमातून सकस अन्न -वस्त्र-निवारा आदी सुविधा मिळवून देत त्यांच्या जीवनात आनंद फुलविला आहे. त्यांचे हे सेवाभावी कार्य आदर्शवत आणि दिशादर्शक आहे. त्यांना लागणारे सहकार्य आणि मदत देण्यासाठी प्राण जीवन सहयोग संस्था कटीबद्ध आहे. अशी ग्वाही संदीप चौकेकर यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी संविता आश्रम पणदुर चे व्यवस्थापक देवू सावंत म्हणाले की, प्राण जीवन सहयोग संस्था शिरवल, सिंधुदुर्गचे संस्थापक अध्यक्ष तथा समाजसेवक संदिप चौकेकर यांचा वाढदिवस जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम पणदुर येथे निराधार बांधवांसोबत साजरा होताना बघुन आनंद होत आहे. आम्ही यानिमित्ताने स्वतः ला भाग्यवान समजतो. आज आनंदाचा दिवस आहे. संदिप चौकेकर आणि प्राण जीवन सहयोग संस्थेचे सेवाभावी उपक्रम कौतुकास्पद असून समाजाला दिशा देण्याचे काम करतात. चौकेकर यांनी निराधार बांधवासोबत केक कापून वाढदिवस साजरा करत त्यांनी निराधारांच्या जीवनात आनंद फुलविला आहे.. चौकेकर यांनी आपल्या दातृत्व भावनेतून संविता आश्रमला केलेली मदत हे सेवाभावी कार्य आहे. जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदीप परब आणि प्राण जीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष तथा समाजभूषण सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर या दोन सामाजिक कार्यकर्त्यांचे मिलन हा दुग्ध शर्करा योग आहे. असे प्रतिपादन देवू सावंत यांनी केले यावेळी पणदुर संविता आश्रमच्या वतीने संदीप चौकेकर यांना कल्पवृक्ष भेट देण्यात आले. जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम पणदुर येथे संदीप चौकेकर यांनी निराधार, वयोवृद्ध, मानसिक रुग्ण यांच्या सोबत स्नेह भोजन करुन त्यांना भेटवस्तू देऊन त्यांच्या सोबत केक कापून वाढदिवस साजरा केला.आणि त्यांच्या जीवनात आनंद फुलविला.यावेळी आपुलकीने निराधार बांधवासोबत त्यांनी संवाद साधला आणि त्यांची आपुलकीने विचारपूस केली. यावेळी निराधार व्यक्तिंच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

टाइम्स स्पेशल

सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्राण जीवन सहयोग संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मंडळींनी संदीप चौकेकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. संदिप चौकेकर आणि प्राण जीवन सहयोग संस्थेच्या वतीने गोवर्धन गोशाळा करंजे येथे मोफत गोचारा प्रदान करण्यात आला. चौकेकर यांनी गोवर्धन गोशाळेला भेट देत माहिती घेतली.तसेच चारा प्रदान केला.आणि गोवर्धन गोशाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले. हळवल ग्रामपंचायत येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर प्रशांत मनोहर गावडे व सिद्धेश परब आणि एस. एस .पी .एम. लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे आणि पडवे मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हळवल ग्रामपंचायत येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.यावेळी हळवल पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थित राहुन मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला. प्राण जीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष तथा समाजसेवक संदीप चौकेकर यांच्या हस्ते कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.यावेळी संदीप चौकेकर यांनी रुग्णांची आस्था पूर्वक विचारपूस केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg