loader
Breaking News
Breaking News
Foto

म्हसळा तालुका सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांना निरोप; रवींद्र पारखे यांचे स्वागत

म्हसळा (वार्ताहर) - सरकारी अधिकारी म्हटलं की बदली नियुक्तीचा खेळ पाठशिवणीला कायमचा ठरलेलाच असतो. पण मिळालेल्या सेवेच्या कालावधीत त्या भागात केलेले काम, राबविलेल्या उत्तमोत्तम अभिनव योजना, तुमची कार्यशैली आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण सर्वसामान्य जनतेला दिलेली वागणूक. यांसारख्या बऱ्याच गोष्टी तुमची ओळख बदली झाल्यानंतर देखील कायम ठेवतात. अन पुढच्या ठिकाणी प्रस्थान करण्याआधी त्याठिकाणी दिला जाणारा निरोपाचा सन्मान सोहळा हे तुमच्या केलेल्या कामाची पोचपावती असते. म्हसळा पोलीस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक संदीप कहाळे यांचा निरोप समारंभ तर दुसऱ्या रवींद्र पारखे या अधिकाऱ्याचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेली 14 महीने संदीप कहाळे यांनी म्हसळा पोलीस स्टेशनचा कार्यभार पाहताना सर्वसामान्यांशी संपर्क वाढविण्या बरोबरच तालुक्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. या कार्यक्रम प्रसंगी हिंदू समाज अध्यक्ष समिर बनकर, मुस्लीम समाजाचे उपाध्यक्ष सलीम उकये, सचिव महेश पवार, महादेव पाटील, मधुकर गायकर, सुनील शेडगे, सौरभ गोरेगावकर, तुकाराम पाटील, निलेश मंदडकर, दिलीप कांबळे, आणी तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg