loader
Breaking News
Breaking News
Foto

मुरुड - डोंगरी गावातील कालकाई मंदीराचा जीर्णोद्धार करण्यात यावा : अरविंद गायकर

कोर्लई (राजीव नेवासेकर) - मुरुड तालुक्यातील डोंगरी गावातील सुप्रसिद्ध कालकाई देवीचे मंदिर असून या मंदिराचा मुरुड जंजिरा पर्यटन क्षेत्र म्हणून आराखडा तयार करण्यात येऊन जीर्णोद्धार करण्यात यावा. याबाबत पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर, उपाध्यक्ष दिव्या सतविडकर, देवेन सतविडकर, इम्तियाज शहाबान, दादा आंबुकर यांनी शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख भरत बेलोसे, तालुका प्रमुख निलेश घाटवळ, ऋषिकांत डोंगरीकर सहका-यांसमवेत अलिबाग -मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांना एका निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, कालकाई मातेचे मंदीर पुरातन काळातील असुन पेशव्यांनी देखील या देवीचे दर्शन घेतले असून जागृत देवस्थान आहे. नवसाला पावणारी म्हणुन भाविकांची श्रद्धा आहे. डोंगरी गावातील डोंगराच्या दोन खड़कांमध्ये तीचे मुळस्थान असुन महाराष्ट्रातुन वेगवेगळ्या ठिकाणाहून नवरात्री व चैत्र महीन्यात भाविक (महीला) मोठ्याप्रमाणात देवीची ओटी भरण्याकरीता, देवीला आपल गा-हाण घालणे, देविच दर्शन सोहळा, जागर व गोंधळाला मंदीरात येतात. पण मंदीराकडे जाणारा रस्ता अरुंद असल्यामुळे रस्त्याच्या बाजुला संरक्षण भिंत व कठडे नसल्यामुळे वेळप्रसंगी एखाद्या भाविकाचे पाय घसरून आपघात झाल्यास १० ते १५ मिटर खोल दरीत पडुन एखाद्या भाविकाच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे भाविक जिव मुठीत घेवुन कालकाई देवीचे दर्शन घेण्यास जात आसतात, देवीचे स्थान हे अडचणीच्या व धोक्याच्या ठीकाणी असल्याने भाविकांना व्यवस्थित दर्शन मिळत नाही.

टाइम्स स्पेशल

आपणांकडुन या मंदीराची पहाणी करून येथे चांगल्या दर्जाचे इंजिनिअर, अधिकारी यांची नियुक्त करून याठिकाणी भाविकांना कालकाई देवीची ओटी भरता येईल, देवीचे मनसोक्त दर्शन घेता येईल या देवीच्या दर्शनाला येणारा प्रत्येक भाविकाचे मन प्रसन्न होईल. अशा प्रकारे मंदीराचे बांधकाम व मंदीराच्या आजुबाजुचे सुशोभिकरण पाहुन पर्यटक पण मंदीराकडे आकर्षिले जातील. अशा प्रकारचा आराखडा तयार करण्यात आल्यास या परीसाराला मोठ्या प्रमाणात पसिध्दी मिळून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. असे पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

आमदार महेंद्रशेठ दळवी यांना दिले निवेदन

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg