loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी तालुका हौशी कबड्डी असोसिएशनच्यावतीने २ नोव्हेंबर रोजी अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा

रत्नागिरी, ३० ऑक्टोबर (वार्ताहर) ः रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या संलग्न असलेल्या रत्नागिरी तालुका हौशी कबड्डी असोसिएशनच्यावतीने रत्नागिरी जिल्हा कबड्डी कुमार, कुमारी गटाची अजिंक्य स्पर्धा लवकरच होणार असून या स्पर्धेसाठी निवड चाचणी स्पर्धा दि. २ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही निवड चाचणी गोगटे-जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी येथे होईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी तालुका कुमार, कुमारी गटाच्या निवड चाचणीसाठी विविध कागदपत्रे व जन्मतारखेची अट पूर्ण करणे बंधनकारक आहे. ७५ किलो वजन गटामध्ये २० वर्षाखालील कुमार गटाच्या स्पर्धेसाठी १८/०१/२००६ व त्यानंतर जन्मलेले खेळाडू असावेत. तर ६५ किलो वजन गटाच्या २० वर्षाखालील कुमारी गटामध्ये २९/१२/२००५ व त्यानंतर जन्मलेले खेळाडू असावेत. तालुका निवड चाचणीसाठी खेळाडूंनी जन्म दाखला, आधार कार्ड, रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनमधील खेळाडू नोंदणी ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. रविवारी २ नोव्हेंबर रोजी होणार्‍या निवड चाचणीसाठी तालुक्यातील सर्व कबड्डी पंचांनी व रत्नागिरी तालुका हौशी कबड्डी असोसिएशनच्या सर्व पदाधिकार्‍यांनी उपस्थित रहावे असे आवाहन कार्यवाह अरूण पवार यांनी केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg