मालवण (प्रतिनिधी) - स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे “सागरी किल्ले अध्ययन केंद्र” स्थापन होणार असून महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या अध्ययन केंद्राला प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ व स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्यावतीने काळसेकर यांचा सिंधुदुर्ग जिल्हा बँक, ओरोस येथे कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे “सागरी किल्ले अध्ययन केंद्र” स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर महाविद्यालयाने सविस्तर प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार शासन तसेच पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने केंद्र सुरू करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या पुढाकारामुळे मालवणात सागरी किल्ले अध्ययन केंद्र स्थापनेला गती मिळाली. काळसेकर यांच्या या योगदानाबद्दल कृ. सी. देसाई मंडळ व सिंधुदुर्ग महाविद्यालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे सचिव चंद्रशेखर कुशे यांच्या हस्ते काळसेकर यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष ॲड. समीर गवाणकर, सदस्य विजय केनवडेकर, गुरुनाथ राणे, प्रभारी प्राचार्य कैलास राबते, इतिहास अभ्यासक व संशोधक डॉ. ज्योती बुवा तोरसकर, डॉ. सुमेधा नाईक, प्रा. डॉ. मल्लेश खोत व प्रा. शंकर खोबरे, शैलेंद्र दळवी आदी उपस्थित होते.
सचिव चंद्रशेखर कुशे यांनी काळसेकर यांच्या योगदानाबद्दल आभार मानले. यावेळी अतुल काळसेकर यांनी या अध्ययन केंद्राच्या पुढील कार्यवाहीसाठी शुभेच्छा दिल्या. सागरी किल्ल्यांचा इतिहास, वारसा आणि संशोधन यांना नवे परिमाण देणारे हे अध्ययन केंद्र भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे संशोधन केंद्र म्हणून विकसित होईल, असा विश्वास काळसेकर यांनी व्यक्त केला.


























































2.jpg)





























.jpg)




























































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.