दापोली (शशिकांत राऊत) - कोकणातील लोकांचे अर्थकारण बदलणारे बहुपयोगी असे कोकम फळ हे सध्या कोकणसाठी खरोखरच वरदान ठरले आहे. अशा या कोकमचा उपयोग खूप पूर्वीपासून आहारीय पदार्थाबरोबरच औषधी म्हणूनही केला जात आहे. अशा कोकमच्या झाडांना साधारणपणे एप्रिल, मे आणि जून महिन्याच्या दरम्यान फळ लागतात.कोकम ही वनस्पती गटिफेरी या कुळातील आहे. याची झाडे केरळ, कर्नाटक व कोकणामध्ये मोठ्या, प्रमाणात आढळतात. याचे फळ जांभळट लाल रंगाचे असते. हे फळ सुकल्यानंतरच त्याचा कोकम किंवा आमसूल म्हणून वापर करतात. याच फळांचा रस काढून त्याचे सरबत, सोलकढी बनविली जाते. कोकमच्या बीमधून तेलही काढले जाते. हेच तेल खाण्यासाठी व औषध म्हणूनही वापरतात. या कोकम फळापासून कोकणातील लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारत चालली असली तरी त्याला मेहनतसुध्दा तशीच करावी लागत आहे. मेहनत करतो त्याला चार पैसे मिळून जातात. अशा या कोकम फळांना यावर्षी चांगलाच बहर आला असल्याने कोकम फळांपासून प्रक्रीया करणारे उदयोग करण्यासाठीची शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ सुरू आहे.
पावसाळा सुरू झाला की, झाडावरील सर्व फळे ही गळून खाली जमीनीवर पडतात आणि त्यांचा उपयोग शुन्य होतो. त्यासाठी पावसाळया आधी अगदी मेहनतीने कोकमीच्या झाडांवरील फळे वेचून काढणे, कोकम सरबतासाठी कोकम फळे झाडावरून अलगद काढणे, आमसुलांसाठी कोकमांना झोडपून पाडणे, पाडलेली कोकमे जमा करणे, त्याची प्रक्रीया करणे, कोकम चिरणे, वाळवणे आदी मेहनतीची कामे कोकणी माणूस आनंदाने करत असल्याचे दिसत आहे.


























































2.jpg)





























.jpg)




























































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.