loader
Breaking News
Breaking News
Foto

तेरेवायंगणी पूर्व वाडीच्या रस्त्याला डांबरीकरणाचा मुहूर्त कधी?

दापोली (प्रतिनिधी) - तेरेवायंगणी पूर्व वाडीचा रस्त्याची दुर्दशा झाली असून येथील रहिवाशांना त्याच दगड धोंड्याच्या रस्त्यातून वर्षोनुवर्षे मार्ग काढावा लागत आहे, हे खरे सत्ताधार्‍यांचे अपयश म्हणावे लागेल. दापोली तालुक्यातील तेरेवायंगणी येथील पूर्व वाडीतील रस्ता डांबरीकरणाची येथील रहिवाशांनी केलेली मागणी प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे गेले अनेक वर्ष लाल फितीत धूळ खात पडली आहे. डांबरीकरण आज होईल, उद्या होईल या केवळ आशेवर असलेल्या येथील रहिवाशांची रस्ता डांबरीकरणाची मागणीला अजून काही मुहूर्त सापडला नाही. त्यामुळे येथील रहिवासी यांची लोकप्रतिनिधींवर मोठी नाराजी आहे. कारण कुठल्याही मतदानाच्या आधी मत पदरात पाडून घेताना आजवर केवळ आश्वासने दिली गेली त्या पलीकडे रस्त्याची सुधारणा काही करण्यात आली नाही. त्यामुळे येथील जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg