loader
Breaking News
Breaking News
Foto

गोरेगाव नेस्को रेव पार्टी ड्रग्स प्रकरण : दोन तरुणांच्या मृत्यूनंतर फरार संशयित आरोपी आयुष साहित्यला अटक

संगलट( खेड) (इक्बाल जमादार) - मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को ग्राउंड वर झालेल्या म्युझिक कन्सर्ट दरम्यान दोन युवकांचा ड्रग्सच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला होता. यानंतर आयुष विकी साहित्य हा उल्हासनगर मधील संशयित आरोपी फरार झाला होता. रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदरावडे यांनी केलेल्या नाकाबंदीमध्ये गोवा येथे कारने जाताना आयुष साहित्य याच्यावर झडप घालून पकडण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गोरेगाव येथील म्युझिक कन्सर्टच्या नावाखाली आयोजित रेव पार्टीमध्ये ड्रग चे अति सेवन करणाऱ्या दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी वनराई पोलिस ठाणे मुंबई शहर येथे भारतीय न्याय संहिता आणि NDPS कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील फरार संशयित आरोपी नामे आयुष विकी साहित्य, वय -२४ रा- उल्हासनगर हा मुंबई गोवा महामार्गाने गोवा येथे पळून जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी कळविण्यात आल्याने पोलादपूर पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्तपणे पोलादपूर येथे नाकाबंदी आणि सापळा रचून ताब्यात घेण्यात आले आहे. आयुष साहित्य याने “एक्सटसी” या नावाचे अमली पदार्थ सदर म्युझिक कन्सर्ट मध्ये वितरित केल्याचे निष्पन्न झाले आहे. आयुष साहित्य या संशयित आरोपीस वनराई पोलिस ठाणेच्या ताब्यात देण्यात आले आहे. फरार झालेला आयुष साहित्य या संशयित आरोपीस पकडण्याची कारवाई रायगड जिल्हा.पोलिस अधीक्षक आँचलदलालयांच्यामार्गदर्शनाखाली पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद गावडे आणि सहकारी यांच्याकडून करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg