loader
Breaking News
Breaking News
Foto

बांदा-लकरकोट येथील श्रीदत्त मंदिरात २६ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन

बांदा (प्रतिनिधी) - बांदा-लकरकोट येथील श्रीदत्त मंदिराच्या कलशारोहण व पुनःप्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक २६ एप्रिल रोजी विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७ वाजता नित्यपूजेनं होणार आहे. त्यानंतर सकाळी ८ वाजता लघुरुद्र, सकाळी ९ वाजता दत्तयाग संपन्न होणार आहे. सकाळी १० वाजता सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान शाखा बांदा यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी १२.३० वाजता आरती व सामूहिक गाऱ्हाणे, तर दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजल्यापासून स्थानिक भजने सादर केली जाणार आहेत. रात्री ९ वाजता शेजारती होईल.

टाईम्स स्पेशल

रात्री ९.३० वाजता दत्तप्रसाद कला-क्रीडा मंडळाच्या यशस्वी कलाकारांकडून हृदयस्पर्शी तीन अंकी सामाजिक नाट्यप्रयोग “उंबरठ्यावरी माप ठेविले” सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी सर्व दत्तभक्तांनी व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष सुशांत पांगम यांनी केले आहे. कार्यक्रमाचे नियोजन श्री दत्तप्रसाद कला-क्रीडा मंडळ लकरकोट-बांदा यांच्यावतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg