उरण(घन:श्याम कडू) - पनवेल तालुक्यातील गव्हाण फाटा येथे असलेल्या जेडब्ल्यूआर गोदामाला दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. आगीने काही क्षणांतच विक्राळ रूप धारण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सतत होणाऱ्या स्फोटांच्या आवाजामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार, गोदामात साठवून ठेवलेल्या केमिकल्सने पेट घेतल्याचे बोलले जात असून, त्यामुळेच आगीची तीव्रता अधिक वाढल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोदामातून एकामागून एक स्फोटांचे आवाज येत असल्याने परिस्थिती अधिकच भयावह बनली आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, आगीचा भडका उडताच गोदामातील कामगारांनी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळ काढला. काही क्षणांतच संपूर्ण परिसर धुराच्या लोटांनी व्यापला गेला. या स्फोटांचे आवाज दूरवर उरण आणि पनवेल परिसरातही ऐकू आल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून, आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आगीचे नेमके कारण अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही. जीवितहानी किंवा आर्थिक नुकसानीबाबतही अधिकृत माहिती समोर आलेली नसली, तरी आगीची तीव्रता पाहता मोठ्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, उरण–पनवेल परिसरात बेकायदेशीर गोदामांचे जाळे विणले गेले असल्याचा आरोप पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशा धोकादायक केमिकल्सचा साठा नियमबाह्य पद्धतीने ठेवला जात असल्यास ही बाब अत्यंत गंभीर असून, “या सर्वांना प्रशासनाचा वरदहस्त आहे का?” असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. याबाबत संबंधित विभागातील कोणाशी संपर्क होऊ शकलेला नाही. आग विझल्यानंतर यामागचे सत्य उघड होईल तोपर्यंत वाट पहावी लागणार आहे. वारंवार घडणाऱ्या अशा दुर्घटनांमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, यापुढे तरी बेकायदेशीर गोदामांवर कठोर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


























































2.jpg)





























.jpg)




























































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.