loader
Breaking News
Breaking News
Foto

रवींद्र कांबळेची महाराष्ट्र सुरक्षा बलमध्ये निवड

लांजा (संजय साळवी) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या संदेशाप्रमाणे दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर लांजा गावचा सुपुत्र असलेल्या रवींद्र चंद्रकांत कांबळे याने अखेर यशाला गवसणी घातली असून त्याची महाराष्ट्र सुरक्षा बल (एम एसएफ) मध्ये निवड झाली आहे. त्याच्या या यशामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लांजा बौद्धवाडी येथील रवींद्र चंद्रकांत कांबळे याला सुरुवातीपासूनच पोलीस खात्याविषयी आकर्षण होते. इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण न्यू इंग्लिश स्कुल लांजा आणि पदवीपर्यंतचे शिक्षण लांजा वरिष्ठ महाविद्यालय येथे झाल्यानंतर रवींद्र कांबळे याने पोलीस खात्याविषयी असलेल्या आकर्षणातून सुरुवातीला काही काळ राजापूर येथे होमगार्ड म्हणून काम केले. मात्र पोलीस खात्याविषयी असलेले आकर्षण त्याला स्वस्त बसू देत नव्हते. त्यामुळेच तो मुंबई येथे गेला. मुंबई येथे त्याने पोलीस खात्यासंबंधीत विविध परीक्षा दिल्या. काही वेळा अपयशयही पदरी आले. मात्र त्याने तो खचून गेला नाही. त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. मात्र पोलीस खात्याची नोकरी मिळविण्यासाठीचा त्याचा संघर्ष सुरूच होता.

टाईम्स स्पेशल

अखेर रवींद्र कांबळे याच्या या प्रयत्नाला यश आले आणि त्याची महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये निवड झाली आहे. त्याने प्रयत्न करत अखेर आपले पोलीस खात्यात सेवा करण्याचे स्वप्न साकार केले आहे. त्याच्या या यशाबद्दल आई सुचित्रा कांबळे, वडील चंद्रकांत कांबळे, काका प्रकाश कांबळे, काकी प्रतिमा कांबळे, राजू कांबळे, भाऊ तुषार कांबळे, तसेच अनंत कांबळे दिलीप कांबळे आणि ग्रामस्थ बौद्धजन मंडळ लांजा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg