loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी रेल्वे स्थानकावरील कोरोना काळात काढून घेतलेले थांबे पूर्ववत करण्याची आमदार सुलभा गायकवाड यांची विधीमंडळात मागणी

सावंतवाडी : भारतीय जनता पक्षाच्या कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुलभा गायकवाड यांनी सावंतवाडी रेल्वे स्थानकावरील असुविधांचा पाढा वाचत कोरोना काळात काढून घेतलेले थांबे पूर्ववत करण्याची मागणी विधीमंडळात लक्षवेधी दरम्यान केली. त्या म्हणाल्या, अनेक कोकणवासीय कल्याण पूर्व भागात राहतात. मात्र, कोरोना काळात कोकण रेल्वेच्या सावंतवाडी रेल्वे स्थानकावरील अनेक रेल्वेचे थांबे बंद केले. ते सुरू करण्यासाठी कोकण रेल्वे संघटनेने पत्रव्यवहारही केले. मात्र, २०२६ उजाडूनही ते थांबे सुरू झालेले नाहीत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे रखडलेले बांधकाम त्वरित पूर्ण करण्यात येऊन केंद्र शासनाच्या अमृत भारत स्थानक योजनेत त्याचा समावेश करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करावा. तर कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणासाठी राज्य सरकारने आर्थिक सहकार्य करून कोकणवासियांना दिलासा द्यावा अशी मागणी भाजप आमदार श्रीमती गायकवाड यांनी केली‌.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg