loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष विलास चाळके यांनी घेतली आमदार किरण सामंत यांची भेट

लांजा (प्रकाश चाळके) : जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर उपाध्यक्ष विलास चाळके यांनी लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांची सदिच्छा भेट घेतली. उपाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतरची ही त्यांची पहिलीच औपचारिक भेट ठरली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा झाली. विशेषतः ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण व आरोग्य सेवांबाबत आगामी नियोजनावर विचारमंथन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आमदार किरण सामंत यांनी उपाध्यक्ष विलास चाळके यांचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्हा परिषद आणि राज्य शासन यांच्यात समन्वय ठेवून जनतेच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष विलास चाळके यांनीही मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा विश्वास व्यक्त केला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg