loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडीत गॅस टंचाईचे सावट; पाटणकर गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या रांगा, पोलीस बंदोबस्त तैनात

​सावंतवाडी : आखाती देशांतील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचे चटके आता सर्वसामान्यांच्या किचनपर्यंत पोहोचू लागले आहेत. गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने सावंतवाडी शहरासह परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा भासत आहे. याचाच परिणाम म्हणून येथील पाटणकर गॅस एजन्सीच्या कार्यालयासमोर गेल्या चार दिवसांपासून ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी ग्राहक पहाटेपासूनच एजन्सीच्या कार्यालयाबाहेर रांगा लावत आहेत. गेल्या चार दिवसांपासून ही स्थिती अधिक गंभीर झाली असून, बुकिंग केलेल्या सिलिंडरची चौकशी करण्यासाठी आणि नवीन बुकिंग करण्यासाठी नागरिकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. ग्राहकांची वाढती गर्दी आणि संभाव्य गोंधळ लक्षात घेता, प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत. आज पाटणकर गॅस एजन्सीबाहेर चक्क होमगार्ड तैनात करण्यात आले होते. पोलिसांचीही या ठिकाणच्या गर्दीवर करडी नजर असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला कसरत करावी लागत आहे.

टाईम्स स्पेशल

आखाती देशांतील अस्थिरतेमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला असून, घरगुती गॅससोबतच व्यावसायिक सिलिंडरचाही तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि सर्वसामान्य गृहिणींचे बजेट कोलमडले असून, गॅस पुरवठा कधी सुरळीत होणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg