loader
Breaking News
Breaking News
Foto

रसायनीत गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा

रसायनी (राकेश खराडे) - गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी रसायनी परिसरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही शोभायात्रा वृंदावन फ्लोरा सोसायटी व पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट व साहस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात पार पडली. मोहोपाडा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या शोभायात्रेला प्रारंभ झाला. यावेळी रसायनीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, हजारो नागरिकांनी रॅलीत सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशा, भगवे ध्वज आणि गुढ्या उभारून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. शोभायात्रा रात्री नऊ वाजता वृंदावन फ्लोरा येथे पोहचताच जल्लोष करुन महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. वृंदावन फ्लोरा सोसायटीच्या वतीने अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे रसायनीकरांकडून सोसायटीच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये रुची सोया पतंजलीचे मॅनेजर संजीव भनोत, जिल्हा परिषद सदस्या नेहा पारंगे, सरपंच उमाताई मुंढे, सभापती कृष्णा परांगे, माजी सरपंच अशोक मुंढे, माजी सरपंच सचिन तांडेल तसेच बापू गुंजाळ, प्रमोद प्रजापती, अरुण गोविंद जाधव (अध्यक्ष, पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्ट), दिपिका भंडारकर, चित्रा मैदर्गींकर, योगेश कांबळे, प्रकाश देवघरे, उमेश मुंढे, स्वप्नील निर्भावाने, विलास जाधव, अनंत माळी, विलास कांबळे, वसंत पाटील, प्रवीण पवार, सागर कडवे, प्रशांत खरात, अल्पेश किस्मतराव, अनिल पाटील, लक्ष्मीकांत गलांडे, अमोल गोरे, समीर दाभोळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वृंदावन फ्लोरा सोसायटीमधील सर्व रहिवाशांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या एकजुटीमुळे आणि उत्कृष्ट नियोजनामुळे रसायनी परिसरात गुढी पाडव्याचा उत्सव अत्यंत जोशात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या शोभायात्रेमुळे रसायनीत नववर्षाचे स्वागत जल्लोषात झाले असून सामाजिक एकात्मतेचा सुंदर संदेशही देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg