loader
Breaking News
Breaking News
Foto

चिखलगावच्या 'लोकसाधना'मध्ये मुलांनी उभारली आनंदाची गुढी

दापोली (सागर गोवळे) - आपलं गाव, आपली माणसं आणि घरचा सण सोडून शिक्षणासाठी शहरातून किंवा लांबच्या गावाहून चिखलगावच्या 'लोकसाधना' प्रकल्पात आलेल्या चिमुकल्यांनी यंदा एक अनोखा उत्साह अनुभवला. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या मुलांनी आपल्या 'लोकसाधना' परिवारासोबत मिळून पारंपरिक पद्धतीने गुढी उभारली आणि 'घरापासून लांब असूनही आम्ही एक आहोत' हा संदेश दिला. शिक्षणाच्या ओढीने अनेक मुले आपली गावे सोडून चिखलगावच्या लोकसाधनेमध्ये राहतात. सणासुदीच्या काळात घराची आठवण येणे स्वाभाविक असते, मात्र लोकसाधनेने या मुलांसाठी अशा वातावरणाची निर्मिती केली आहे की त्यांना घराची उणीव अजिबात भासली नाही. नवीन कपडे, कडुलिंबाचा प्रसाद आणि पारंपरिक गुढी उभारून मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसून आली. खास वैशिष्ट्ये म्हणजे ​लांबून आलेल्या मुलांनी एकमेकांसोबत सण साजरा करून 'लोकसाधना' हेच आमचे घर असल्याचे दाखवून दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पारंपरिक उत्साह मुलांनी स्वतः गुढीची काठी सजवली, रांगोळी काढून पाटावर उभी करून काठी बांधली या मधे मुली/मुलं एकता दिसुन आली. पुस्तकी ज्ञानासोबतच महाराष्ट्राची परंपरा जपण्याचे संस्कार येथे मुलांवर होताना दिसले. ​"आम्ही जरी आमच्या गावापासून लांब असलो, तरी लोकसाधनेमध्ये आम्हाला आई-वडिलांसारखं प्रेम मिळतं. आजची गुढी उभारताना आम्हाला घराची आठवण आली नाही, तर घरच्यांसोबत सण साजरा केल्याचा आनंद मिळाला, असे येथील विद्यार्थ्यांनी सांगितले.​चिखलगावच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, शिक्षणासोबतच मुलांच्या आनंदाची काळजी घेणारी ही 'लोकसाधना' खऱ्या अर्थाने एक संस्कार केंद्र ठरत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg