loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

खेड : तालुक्यातील घाणेखुंट गवळवाडी येथील नरेंद्रसिंग मदनसिंग चौहान (२१, मूळ रा. करमाळ - वेरा, खेजडिया ता. मारवाड, जि. राजस्थान) याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घटनेची खबर संजय मदनसिंह चौहान (३९) यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली. मयत नरेंद्रसिंग मदनसिंग चौहान व खबर देणार हे हार्डवेअरच्या दुकानात एकत्रित काम करीत होते. मंगळवार दिनांक १२ मे रोजी दुकानात मयत नरेंद्रसिंग मदनसिंग चौहान हा आला नव्हता म्हणून लहान भाऊ सारखा फोन करीत होता, पण मोबाईल काही उचलत नव्हता, अखेर मित्राच्या वडिलांच्या मदतीने घरी जाऊन कोणत्यातरी हत्याराने कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला असता लाल रंगाच्या ओढणीच्या मदतीने पंख्याला गळफास लावून घेऊन मृतावस्थेत आढळुन आला. कळंबणी येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg