loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीच्या सुवर्णकन्येची सुवर्ण झेप

मुंबई विरार येथे २८ आणि २९ एप्रिल रोजी पार पडलेल्या ‘व्हिक्टरी क्लब ६ वी महाराष्ट्र ओपन स्टेट तायक्वॉंदो चॅम्पियनशिप २०२६’ या भव्य स्पर्धेमध्ये रत्नागिरी येथील SRK तायक्वॉंदो अकॅडमीची खेळाडू सुवर्णकन्या स्वरा साक्षी विकास साखळकर हिने नेहमीप्रमाणेच उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने आणि सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या 6 वी ओपन राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये रत्नागिरीतील एस आर के तायक्वांदो क्लब रत्नागिरी येथील स्वरा विकास साखळकर हिने कॅडेट गटात 44 किलो खालील वजनी गटात सुवर्णपदक मिळवून पदकाचे खाते खोलले त्यानंतर झालेल्या ज्युनियर गटात 44 किलो वजनी गटात अजून एक सुवर्णपदक आपल्या नावावर केले पुमसे प्रकारात वैयक्तिक पुमसे प्रकारात कास्यपदक मिळवून आपल्या पदकांची संख्या तीन केली. राज्यस्तरीय स्पर्धेत दोन सुवर्णपदक आणि एक कांस्यपदक मिळवणारी स्वरा ही नगरपरिषद शाळा क्रमांक पंधरा ची विद्यार्थिनी असून इयत्ता सातवी मध्ये शिकत आहे स्वरा हिला या स्पर्धेसाठी राष्ट्रीय प्रशिक्षक व पंच शाहरुख शेख सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .

टाइम्स स्पेशल

तिने मिळवलेल्या या यशाबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, खजिनदार व्यंकटेश्वर कररा, सचिव सुभाष पाटील, उपाध्यक्ष व शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, सदस्य अजित गार्गे, नीरज बोरसे, सतीश खेमसकर यांच्यासह जिल्हा उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार प्राप्त तायक्वांदो प्रशिक्षक प्रशांत मकवाना, मिलिंद भागवत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.त्याचबरोबर एस आर के क्लबचे अध्यक्ष अमोल सावंत, उपाध्यक्ष वीरेश मयेकर, सचिव शीतल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत, सदस्य निखिल सावंत, प्रफुल्ल हतिसकर, शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग आणि समस्त पालक वर्ग यांनीही स्वराचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg