loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणात लवकरच आधुनिक ओटीटी सेवेची एंट्री; एकाच अ‍ॅपमध्ये मिळणार अनेक प्लॅटफॉर्म - अनिकेत कदम

खेड (प्रतिनिधी) : कोकणातील मनोरंजन क्षेत्रासाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईनंतर आता कोकणातही इंटरनेटवर आधारित विविध ओटीटी प्लॅटफॉर्मची सेवा एकाच अ‍ॅप्लिकेशनमध्ये उपलब्ध होणार आहे. हॅथवे साई स्टार डेटा कॉम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून कोकणवासीयांसाठी आधुनिक डिजिटल मनोरंजनाचे नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती कंपनीचे डायरेक्टर अनिकेत सदानंद कदम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. आजच्या डिजिटल युगात ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत असून चित्रपट, वेब सिरीज, मालिका, क्रीडा स्पर्धा आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांचा कल इंटरनेट आधारित सेवांकडे वाढत आहे. हीच गरज ओळखून कोकणातील ग्राहकांसाठी एकाच अ‍ॅपमध्ये अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पत्रकार परिषदेत बोलताना अनिकेत सदानंद कदम यांनी सांगितले की, कोकणातील नागरिकांना घरबसल्या दर्जेदार आणि आधुनिक मनोरंजन सहज उपलब्ध व्हावे, यासाठी कंपनीकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील ग्राहकांनाही उत्तम दर्जाची डिजिटल सेवा मिळावी यासाठी आवश्यक तांत्रिक सुविधा विकसित करण्यात येत आहेत. येत्या काही दिवसांत ही सेवा कोकणात प्रत्यक्ष सुरू होणार असून त्यासाठीची तांत्रिक प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या नव्या ओटीटी सेवेचा लाभ विशेषतः युवक, कुटुंबीय आणि डिजिटल माध्यमांचा वापर करणाऱ्या ग्राहकांना मोठ्या प्रमाणात होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच मनोरंजन क्षेत्रात कोकणालाही आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवे व्यासपीठ मिळणार असल्याने स्थानिक ग्राहकांना मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. कोकणातील जनतेने या आधुनिक ओटीटी सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही अनिकेत सदानंद कदम यांनी यावेळी केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg