दापोली (वार्ताहर ) : दापोली तालुक्यातील लाडघर येथील समुद्रकिनारा विकासाचा ‘ब्लू फ्लॅग’ संकल्प पूर्णत्वास नेण्याच्या दिशेने आज ऐतिहासिक पाऊल टाकण्यात आले. दापोली तालुक्यातील निसर्गरम्य ताम्रवर्णी लाडघर समुद्रकिनाऱ्यावर ‘ब्लू फ्लॅग’ पायलट प्रकल्पांतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आले. स्वच्छता, सुरक्षितता, पर्यावरण संवर्धन आणि आधुनिक सुविधांच्या जागतिक निकषांवर आधारित या प्रकल्पासाठी यापूर्वी मंजूर २० कोटी रुपयांसह अतिरिक्त ८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, एकूण २८ कोटी रुपयांतून लाडघरचा कायापालट करण्यात येणार आहे.या प्रकल्पांतर्गत आधुनिक स्वच्छतागृहे, चेंजिंग रूम्स, शुद्ध पिण्याचे पाणी, सुरक्षा व्यवस्था, कचरा व सांडपाणी व्यवस्थापन तसेच दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा उभारण्यात येणार आहेत.
‘ब्लू फ्लॅग’ मानांकनामुळे लाडघरला जागतिक पर्यटन नकाशावर नवी ओळख मिळून स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास योगेश कदम यांनी कार्यक्रमात व्यक्त केला यावेळी माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे,पंचायत समीती सभापती उन्मेष राजे, विधानसभा क्षेत्रप्रमुख आणि जिल्हापरिषद सदस्य किशोर देसाई, विधानसभा संघटक प्रदीप सुर्वे, उपसभापती सौ.नम्रता तोडणकर, तालुका संघटक प्रकाश कालेकर, महीला तालुका संघटक सौ.दित्पी निखार्गे, सरपंच सौ. मानसी बोवणे, सुधिर साळवी, विभागप्रमुख मंगेश पवार, शाखाप्रमुख सुहास बाळ तसेच स्थानिक पदाधिकारी,पर्यटन व्यवसायिक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.