loader
Breaking News
Breaking News
Foto

आमिर गॅसवाहू जहाज जेटीवरून हलवले

रत्नागिरी : जयगड बंदरात चौकशीसाठी आणलेले आमिर गॅसवाहू जहाज जप्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर ते पंधरा ते वीस दिवस जेएसडब्ल्यू पोर्टच्या जेटीला लावून ठेवण्यात आले होते. अनेक दिवस हे जहाज जेटीला असल्याने जेएसडब्ल्यूची अन्य जहाजे येण्यास अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे न्यायालयाच्या परवानगीने हे जहाज जेटीवरून हलविण्यात आले आहे. तेथून ते खोल समुद्रात नांगरून ठेवण्याचे आदेश आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठाने याबाबतचा आदेश दिला आहे. त्यामुळे पुढील आदेश होईपर्यंत जहाजावरील माल उतरविण्यास मनाई करण्यात आली आहे. जेएसडब्ल्यू पोर्टच्या बाहेर हे जहाज जाता कामा नये, असे आदेशात म्हटले होते. बोगस कागदपत्र दाखवून माल वळवला गेल्याची धक्कादायक माहिती झांग यूनियन इंडरनॅशनल यांनी दाखल केलेल्या तक्रारीतून उघड झाली. बचाव पक्ष एलपीजी आमिर गॅस ही आहे. न्यायालयाने जहाजावर असलेला 'एलपीजी माल उतरवण्यास सक्त मनाई केली आहे. तसेच जहाज सध्या जयगड पोर्ट येथेच थांबवून ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जेएसडब्ल्य जयगड पोर्ट लि. यांना जहाजाला बाहेर जाण्यास परवानगी देऊ नये, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. याशिवाय, जहाज भारतीय सागरी हद्दीबाहेर जाऊ नये आणि त्यावरील माल उतरवला जाऊ नये, याची खात्री करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

टाइम्स स्पेशल

आमिर गॅसवाहू जहाज या जहाजाचे दोन मालक आहेत. परंतु प्रत्येकाचे अधिकार वेगळे आहेत. गॅस भरुन नेण्यासाठी ते भाडे कराराने घेतले होते. दोन कंपन्या आहेत त्यापैकी एक कंपनीला ते पाकिस्तानला न्यायचे होते. हा कार्गो इराकमध्ये लोड झाला, मात्र आयत्यावेळी या जहाजाचा मार्ग बदलल्याचे मूळ जहाज मालकाच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी याबाबत तक्रार केली. लोड करण्यात आलेला माल पाकिस्तानसाठी जाणार होता. परंतु या दोन मालकांच्या वादातुन सिपमॅनेजमेंट चालवते तो मास्टर बदलला आणि दुबईला दुसऱ्या मास्टरला चुकीची माहिती दिली. जयगड बंदरात जाण्यासाठी खोटी कागदपत्र तयार करण्यात आल्याची माहिती या चौकशीत पुढे आली. मूळ मालकाच्या तक्रारीनंतर हा सर्व बनाव उघड झाल्यामुळे न्यायालयाने याची गंभीर दखल घेत हा निर्णय दिला होता.न्यायालयाची परवानगी घेऊन हे जहाज जेटीवरून जवळच खोल समुद्रात नांगरून ठेवण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

जेएसडब्ल्यू पोर्टला अडचणी ; न्यायालयाच्या परवानगीने नांगरले समुद्रात

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg