loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवणात डंपरच्या धडकेत मोटारसायकलस्वार गंभीर जखमी

मालवण (प्रतिनिधी) - मालवण शहरातील सागरी महामार्गावर एका भरधाव डंपरने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वार विरेश विश्वनाथ कदम (रा. कांदळगाव) हे गंभीररित्या जखमी झाले. याबाबत मालवण पोलिसांनी डंपर चालक प्रभाकर हनुमंत वडार (रा. न्यू खासकीलवाडा, सावंतवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या अपघातप्रकरणी पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी (रा. धुरीवाडा, मालवण) यांनी मालवण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार रात्री साडे वाजण्याच्या सुमारास मालवण शहरातील सागरी मार्गांवरून कोळंब येथून देऊळवाड्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने (क्र. एम.एच. ०७ सी. ५४०४) आराध्या हॉटेल समोरील रस्त्यावर समोरून येणाऱ्या कांदळगावच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकलला (क्र. एम. एच. ०७ ए.एन. ४४५९) धडक दिली. या धडकेत मोटारसायकलस्वार विरेश विश्वनाथ कदम हे गंभीर जखमी झाले तसेच दुचाकीचे नुकसान झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी व राजकीय पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी विरेश कदम यांना मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी कुडाळ येथे हलविण्यात आले. यावेळी रोहन कदम, विहार कोदे आदी व इतर उपस्थित होते. मालवण पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. या प्रकरणी मालवण पोलीसांनी डंपर चालक प्रभाकर वडार याच्यावर भरधाव व हयगयीने वाहन चालवून अपघात केल्याप्रकरणी, मोटरसायकलस्वाराच्या दुखापतीस व मोटरसायकलच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५ A, १२५ B आणि मोटर वाहन ऍक्ट कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस हवालदार जनार्दन रेवंडकर हे करत आहेत.

टाइम्स स्पेशल

दरम्यान, डंपरने मोटरसायकलस्वारास धडक दिल्याचे वृत्त कळताच मालवणमधील नागरिकांसह लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी यांनी रात्री मालवण पोलीस ठाण्यात दाखल होत पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्याशी चर्चा केली. मालवण शहर तसेच तालुक्यात भरधाव डंपर वाहतुकीमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढत असून याबाबत कठोर कारवाई करावी, भरधाव डंपर वाहतुकीला आळा घालावा, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली. यावेळी ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, रविकिरण तोरसकर, ललित चव्हाण, नगरसेविका अनिता गिरकर आदी व इतर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg