loader
Breaking News
Breaking News
Foto

माझ्या समाजाचे वाटोळे होणार असेल तर मी तुम्हाला कोणालाच मोजणार नाही : मनोज जरांगे

पुणे : माझे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वाईट मत नाही. पण माझ्या समाजाचे वाटोळे होणार असेल तर मी तुम्हाला कोणालाच मोजणार नाही. मला मित्र नको, मंत्र्यांशी संबंध नको मला केवळ माझ्या समाजाचे लेकरं मोठी करायची आहेत. मी फडणवीस यांना दोष देत नाही माझं म्हणणं केवळ इतके आहे की हैदराबादचा जीआर काढला पण प्रमाणपत्र रोखले का नाही? ते आता बंद कसे झाले? तुम्हाला मुख्यमंत्री मराठ्यांनीच केले आहे हे लक्षात ठेवा असे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.मराठा आरक्षणासाठी सरकारने सातारा संस्थानच्या गॅझेटचा जीआर काढू असे सरकारने सांगितले होते पण तसे काही केले नाही, आंदोलन केल्याशिवाय सरकार काही ऐकत नाही. हैदराबाद गॅझेटनुसार 308 का असेना नोंदी निघाल्या ना? अधिकारी सांगतात सरकारने आदेश दिले नाही, मग काय आमच्या पोरांचे वाटोळे झाल्यावर सरकार आदेश देणार का? असा सवाल मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मनोज जरांगे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना वाटत असेल की तेच हुशार आहेत पण शेतकरी सुद्धा फार हुशार आहे. तुम्ही आमचे प्रमाणपत्रे रोखले आहे. प्रमाणपत्र सरकारने रोखले आहेत. फडणवीस यांनी एक भाषण केले होते की मंत्र्यांना किंमत नाही, मुख्यमंत्रीच सर्व काही असतो. मग आमचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हीच रोखले आहेत. सरकारने हैदराबाद गॅझेटचा जीआर लागू झाला आहे. कुणबी प्रमाणपत्र देणं अचानक का बंद झाले. तुम्ही प्रमाणपत्र द्या आणि समाजाचे मन जिंका आम्हाला सत्ता नको. फडणवीस तुम्ही नाही तुमच्या 50 पिढ्या जरी आल्या तरी मी मराठ्यांना धक्का सुद्धा लागू देणार नाही.मनोज जरांगे म्हणाले की, आंदोलनाच्या तारखेच्या आत जर कुणबी प्रमाणपत्र दिले नाही तर भयानक आंदोलन होणार. 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्याचे प्रमाणपत्र वाटप करा. काम करा नाही तर सर्वांना पट्ट्यावर घेतो. प्रमाणपत्र दिल्याशिवाय सरकारला सुटी नाही. सातारा संस्थानचा जीआर तुम्ही का काढत नाही? असा सवाल सुद्धा जरांगे यांनी केला आहे. आम्ही तुम्हाला बराच वेळ दिला आहे आता तुम्हाला वेळ देऊ शकत नाही. 1994 ला जसा जीआर काढला होता

टाइम्स स्पेशल

मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजाचे मुले अधिकारी होताय म्हणून सरकार जळायला लागले आहे. म्हणून ते समाजाला प्रमाणपत्र देत नाही. मराठ्यापुढे शहानपण चालत नाही. सरकारकडून मराठा-कुणबी प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ सुरू आहे. सरकारला आपल्या मराठा समाजाबद्दल इतका द्वेष का आहे? मराठा समाजाचे नेते जर पक्षाच्या बाजूने राहिले तर तुमच्या मुलांचे नुकसान होईल. पक्ष वाढवण्याच्या नादात जात वाढणार नाही. म्हणून पक्षाचा नाही तर आपल्या लेकरांचा विचार करा.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

तुम्ही आमचे प्रमाणपत्रे रोखले आहे.

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg