loader
Breaking News
Breaking News
Foto

माणगाव उपजिल्हा रुग्णालयाने उपचार नाकारल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू

म्हसळा (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक वृत्त समोर येत आहीे. उपचाराविना जबरदस्तीने घरी पाठविल्याने एका १४ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रायगडच्या म्हसळा तालुक्यातील घूम गावामधील ही घटना आहे. इयत्ता ७वीत शिकणारा गर्वांग दिनेश गायकर या मुलाला मांडीवर पूळी आल्याने ताप येत होता. म्हसळा येथील सरकारी दवाखान्यात उपचार करुन अधिक उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईक घेऊन गेले मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन या मुलावर उपचार केले नाहीत, असे पालकांचे म्हणणे आहे. उपचार न करता त्याला रुग्णालयातून पाठविण्यात आले. त्यानंतर तापात फडफडणारा गर्वांगचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूला डॉक्टर जबाबदार असल्याचा दावा त्याच्या वडीलांनी केला आहे. गर्वांगच्या मृत्यूने घूम गावात शोककळा पसरली आहे. माणगाव उपजिल्हा रुग्णालयाने उपचार नाकारल्याने गर्वांगचा मृत्यू झाला, असे कुटुंबियांचे म्हणणे आहे. या घटनेने रायगडसह रत्नागिरी जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg