loader
Breaking News
Breaking News
Foto

काजूच्या संदर्भात शासनाने सकारात्मक निर्णय घेण्याची सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी आणि फळबागायतदार संघाची मागणी---

बांदा (प्रतिनिधी)- काजू खरेदी-विक्री दर, आयात शुल्क, अनुदान काजू बोंडू प्रक्रिया आणि काजू महोत्सव याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी आणि फळबागायतदार संघ यांच्यावतीने महाराष्ट्र राज्य कृषी पणन विभागाचे अधिकारी विनायक कोकरे व मिलिंद जोशी यांना करण्यात आली. संघाच्या पदाधिकार्‍यांनी अधिकार्‍यांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. काजु फळ प्रक्रिया लगतच्या गोवा राज्यात कशा प्रकारे केले जाते ते पाहण्यासाठी नितीन मावळणकर यांच्या फकिरफाटा (गोवा) येथील कुटीर उद्योगास भेट देण्यात आली. भविष्यात काजू बोर्ड हे सिंधुदुर्गातील आंबा काजू बागायतदारांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभा राहील असे आश्वासन यावेळी अधिकार्‍यांनी दिले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी आणि फळबागायतदार संघटनेचे अध्यक्ष विलास सावंत, सचिव नितीन मावळणकर, दोडामार्ग शेतकरी तालुका शेतकरी आणि फळ बागायतदार संघाचे अध्यक्ष संजय देसाई, प्रगतशील उद्योजक चंद्रशेखर देसाई, रोणापालचे माजी सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते सुरेश गावडे, शेतकरी प्रणव नाडकर्णी, सेवानिवृत्त शिक्षक गोपाळ करमळकर आणि श्री. सावंत आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सिंधुदुर्ग बागायतदार प्रोडूसर कंपनी यांना सर्व स्तरावरून सहकार्य करणार असल्याची ग्वाही यावेळी दिली. शासनाच्या अनेक योजना आहेत त्याचा लाभ आपल्या कंपनीला होईल यासाठी प्रयत्न करण्यात येईल. शासकीय निकषाची पूर्तता वेळेत कशी होईल याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. येथील बहुतांश शेतकर्‍यांना काजू अनुदान प्राप्त झाले आहे. तर काही शेतकर्‍यांचे अनुदान तांत्रिक कारणामुळे राहीले आहे. त्याची पूर्तता तात्काळ करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ज्या शेतकर्‍यांनी अडचणीमुळे अनुदान अर्ज सादर केले नाहीत त्यांनी 24 एप्रिल पर्यंत अर्ज सादर करावा आणि लाभ घ्यावा. संघाच्या कार्यालयात अर्ज सादर करावेत, अन्यथा आपापले अर्ज वेंगुर्ले येथील काजू बोर्ड कार्यालयात स्वतः नेऊन सादर करावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg