loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा तालुका मराठा संघाच्यावतीने मुंबईस्थित मराठा समाज बांधवांचा २२ मार्च रोजी मेळावा

लांजा (संजय साळवी) - लांजा तालुका मराठा संघाच्यावतीने मुंबईस्थित मराठा समाज बांधवांचा मेळावा रविवार दि. २२ मार्च रोजी सकाळी १० वाजता पराग विद्यालय, भांडुप मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. लांजा तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी एकत्र येत १९८३ साली लांजा तालुका मराठा संघाची स्थापना केली होती. त्यानंतर या संघाच्यावतीने दरवर्षी शिवजयंती उत्सव व विद्यार्थी गुणगौरव यासारखे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.‌ लांजा तालुक्यातील अनेक मराठा समाज बांधव हे मुंबई येथे नोकरी व व्यवसाय निमित्त स्थायिक झालेले आहेत.‌

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गावी आल्यानंतर त्यांच्या मनात एकच खंत असते ती म्हणजे आपल्या समाजाचे हक्काचे असे एक केंद्र लांजा याठिकाणी उभे राहिले पाहिजे. या केंद्राच्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, मराठा विद्यार्थी वस्तीगृह, मराठा उद्योग केंद्र यासारखे उपक्रम राबविले जातील. तसेच या केंद्रात शिवछत्रपतींचा आश्वारूढ पुतळा असेल. असे हे बहुउद्देशीय लांजा तालुका मराठा भवन या ठिकाणी उभे राहावे, अशी समस्त मराठा समाज बांधवांची भावना आहे. किंबहुना मराठा समाज बांधवांच्या भावनांची ही वास्तू असावी असे प्रत्येक मराठा समाज बांधवाला वाटत असते.

टाईम्स स्पेशल

यासाठीच मराठा भवनच्या निर्मितीचे निश्चित धोरण ठरविण्यासाठी लांजा तालुक्यातील मुंबईस्थित मराठा समाजातील व्यावसायिक, उद्योजक आणि अन्य समाजबांधवांशी चर्चा करण्यासाठी तसेच पुढील दिशा ठरविण्यासाठी लांजा तालुका मराठा संघाच्यावतीने रविवार दि. २२ मार्च रोजी हा मुंबईतील मराठा समाज बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या मेळाव्याला लांजा तालुक्यातील मुंबईस्थित मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लांजा तालुका मराठा संघाचे अध्यक्ष सुभाष राणे, सरचिटणीस विजय पाटोळे तसेच सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg