loader
Breaking News
Breaking News
Foto

केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाविरोधात तहसिलदार लांजा यांना निवेदन

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - पेट्रोलियम पदार्थ आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या दरवाढी विरोधात लांजा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणा विरोधात शांततामय पध्दतीने तहसिलदार लांजा यांना निवेदन देण्यात आले. देशाच्या सध्याच्या महागाईत सर्व सामान्य नागरीकांना जगणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर व पेट्रोलियम पदार्थाच्या किंमतीत सातत्याने वाढ करून सामान्य नागरिकावर अतिरिक्त बोजा टाकला आहे. त्यामुळे कुटुंबियांचे मासिक अर्थकारण कोलमडले असुन गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबीयांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किमती वाढल्या तरी त्याचा भार सर्व सामान्य नागरिकावर पडू दीला नाही. अनुदानाच्या माध्यमातून जनतेला दिलासा देण्याचे काम करण्यात आले होते. परंतु सध्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने एलपीजी गॅस सिलेंडर च्या किंमतीत मोठी वाढ करून आर्थिक कोंडी केली आहे. काँग्रेस सरकारच्या काळात 400 रूपयाला गॅस मिळत होता. आता दुप्पट 900 रूपयाहुन अधिक रक्कम मोजावी लागत आहे, तरीही सिलेंडर मिळविण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे.

टाईम्स स्पेशल

शासनाकडून गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात परीस्थिती वेगळी असुन सिलेंडर मिळत नसल्यामुळेच छोटे मोठे व्यवसाय बंद पडू लागले आहेत. गॅस सिलेंडर सहज उपलब्ध होत नसल्यामुळे जनतेतून प्रचंड असंतोष असल्याचे निवेदनात म्हटले असुन या पार्श्वभूमीवर तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देताना काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद, तालुका अध्यक्ष राजेश राणे, महेश सप्रे, इम्रान सय्यद, अशोक कदम, दीपक पीलके, सुरेश पाध्ये, सुरेश खानविलकर, मनोहर कदम, ॲड राहुल देसाई, आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg