loader
Breaking News
Breaking News
Foto

एस. एस. म्युझिकल इव्हेंट्स लाइव्ह ऑर्केस्ट्रा अल्वेस हिट्स या संस्थेचा पहिला वर्धापन दिन मुंबई येथे उत्साहात साजरा

आबलोली (संदेश कदम) - एस. एस. म्युझिकल इव्हेंट्स लाइव्ह ऑर्केस्ट्रा हिट्स या संस्थेचा पहिला वर्धापन दिन मुंबई येथील सरस्वती ऑडिटोरियम सायन येथे उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजक संध्या कांबळे आणि आयोजक फिल्म डायरेक्टर सुनिल कांबळे यांनी वर्षांपूर्वी रोवलेले रोप फुलायला लागले. वर्षभरात अकरा शो झाले यातील गायक मंडळींनी अप्रतिम गाणी सादर केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये राजलक्ष्मी मानसी हुले, मनिषा जाधव, अश्विनी मोहिते, जितेंद्र खैरनार, प्रकाश जाधव, अनिल सावंत, विश्वम्भर दास, सुधाकर सोनवडेकर, रविंद्र अहिरे, दिपक जाधव, तारकांत पवार, कुंदाताई पराग केंकरे, रजनी राजेंद्र कुलकर्नी, संध्या पवार, मंगला सावंत, शैलेंद्र पवार, के राजू, विनयानंद, गजानन सांगळे, अंजुश्री, अमित रॉय, पियाली मुखर्जी, निवेदक लता गणता यांचे निवेदन अप्रतिम होते. तर वादन तर शब्दच नाही किशोर नांगरे संगीत संयोजक, राजू धनावडे हॅन्ड सोनिक आणि ढोलक संतोष कदम, ढोलक बाबू शेवगे, कोंगो दिनेश जाधव, कीबोर्डस्ट अक्षय भोगले, कीबोर्डस्ट सिद्धू मोसमकर, साईड रिदयम ङ्गआणि आमचे मुख्य अतिथी महाराष्ट्राचे लाडके ढोलकीपटू प्रभाकर मोसमकर यांची उपस्थिती होती.

टाईम्स स्पेशल

निखिल पांचाळ साऊंड सिस्टिम यांची साऊंड सिस्टीम आशिष सावंत, विशाल पवार, आकाश पवार, अशा अनेक कलाकारांचा संच असलेला हा वाद्यवृंद नसून एक कुटुंब आहे. यात कोणीही प्रमुख नाही तर प्रत्येक जण आपला माणूस आहे. पहिला वर्धापन दिन अतिउत्तम होण्यासाठी आवर्जून उल्लेख तो राजलक्ष्मी आणि आयोजक संध्या कांबळे यांनी केलेली मेहनत नावारूपाला आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg