खेडः पाळीव कोंबड्या आणि हंसांच्या ओरडण्यामुळे झोप मोड होत असल्याच्या कारणावरून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तिसे येथे एका वकिलावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी खेड पोलिसांनी दोन भावांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिसे येथील रहिवासी असलेले ५५ वर्षीय वकील अॅड. नवाबखान निझाम अहमद तिसेकर हे १५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आपल्या घरी असताना, त्यांना घराबाहेरून कोणाच्या तरी ओरडण्याचा आणि शिवीगाळ करण्याचा आवाज आला. त्यांनी दरवाजा उघडून बाहेर पाहिले असता, संशयित आरोपी असिफअली महमद तिसेकर हातात दगड घेऊन समोर उभा होता. "तुझ्या कोंबड्या आणि हंस दुपारी ओरडतात, त्यामुळे माझी झोप मोड होते," असे ओरडत त्याने प्रथम एक दगड हंसावर भिरकावला आणि त्यानंतर दुसरा मोठा दगड थेट फिर्यादींच्या दिशेने फेकला. हा दगड अॅड. तिसेकर यांच्या डाव्या खांद्याला लागल्याने ते जखमी झाले.
इतक्यावरच न थांबता, आरोपी असिफअली याने जवळच असलेले धान्य दळण्याचे जड दगडी जाते उचलून फिर्यादींच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्याचा मोठा भाऊ जहिर अली तिसेकर तिथे पोहोचला आणि त्यानेही फिर्यादींना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या अॅड. तिसेकर यांनी १९ मार्च रोजी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्राराची गंभीर दखल घेत दोन्ही संशयीत आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ६३/२०२६ नुसार कलम ११८(१), ३५२, ३५१(२), १३१ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.



























































































































































































































































































.jpg)





















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.