loader
Breaking News
Breaking News
Foto

परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित शिशुविहार चिपळूण येथे गुढीपाडवा उत्साहात

चिपळूण (सत्यवान विचारे) - गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा प्रारंभ दर्शवणारा एक अत्यंत महत्त्वाचा सण असून तो आनंद, समृद्धी आणि नवचैतन्याचे प्रतीक मानला जातो. या दिवशी घराघरांत गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते. गुढी ही विजय, यश आणि शुभतेचे प्रतिक मानली जाते. याचेच औचित्य साधून परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित शिशुविहार, चिपळूण येथे शुक्रवार दिनांक २० मार्च २०२६ रोजी गुढीपाडवा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. आपली पंरपरा आणि संस्कृतीचे जतन व्हावे म्हणून वरील शिशुवर्गात प्रत्येक सण साजरा होत असतो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी शाळेचा परिसर आकर्षक फुलांच्या सजावटीने, रंगीबेरंगी रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता. प्रवेशद्वारावर सुंदर रांगोळी काढून तसेच सणाच्या शुभेच्छा देणारे फलक लावून वातावरण आनंदमय करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने गुढी उभारून व पूजन करून करण्यात आली. गुढीला रेशीम कापड, कडुलिंबाची पाने, साखरेच्या गाठी व फुलांनी सजविण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सणाची शोभा अधिक वाढवली. शाळेच्या विभाग प्रमुख श्रुती रानडे व विद्यार्थ्यांनी गुढीची पूजा केली. मनाली जंगम यांनी विद्यार्थ्यांना या सणाचे सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्व समजावून सांगत भारतीय परंपरेची ओळख करून दिली.

टाईम्स स्पेशल

विद्यार्थ्यांमध्ये संस्कृतीबद्दल जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या विभाग प्रमुख श्रुती रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सणउत्सवप्रमुख योगिता राणीम व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने उत्साही सहभागाने आनंददायी वातावरणात संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg