तिलारी (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यातील तेरवण मेढे धरण परिसरात एका युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दत्तप्रसाद गवस (रा. पिकुळे) असे मृत युवकाचे नाव असून, या घटनेमुळे पिकुळे आणि तेरवण मेढे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. धरणाच्या ठिकाणी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये तो धरणावरून बाबरवाडी रस्त्यावर जाताना तसेच माघारी फिरत स्कुटर बाजूला उभी करून धरणाच्या ठिकाणी जाताना सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज मध्ये दिसून येत आहे. याबाबत भाऊ पंकज सुभाष गवस याने फिर्याद दिली आहे. पुढील तपास दोडामार्ग पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दत्तप्रसाद हा गुरुवारी संध्याकाळपासून आपल्या घरातून बेपत्ता झाला होता. तो घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्याने नातेवाईकांनी त्याची सर्वत्र शोधाशोध केली, मात्र त्याचा कोणताही थांगपत्ता लागला नाही. अखेर (शुक्रवारी) सकाळी धरणाच्या पाण्यात त्याचा मृतदेह आढळून आला. तेरवण मेढे उन्नेयी बंधारा या ठिकाणी गुरुवारी रात्री पासून अनोळखी स्कुटर एम. एच. ०७-५५२२ उभी केलेली आहे. सोबत कुणी नाही ही माहिती येथील वाॅचमन यांनी दोडामार्ग पोलिसांना खबर दिली. गाडी नंबर पाहिला असता ती पिकुळे येथील असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी संपर्क साधला असता दत्तप्रसाद सुभाष गवस हा गुरुवारी गेला होता हे स्पष्ट झाले. धरणाच्या ठिकाणी जाऊन खाञी केली असता तोच असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलीस सहाय्यक निरिक्षक इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक, तसेच सामाजिक कार्यकर्ते पपू म्हापसेकर, महेश चिरमुरे यांनी खाली उतरून मृतदेह बाहेर काढला. यावेळी अनेकांनी गर्दी केली होते. दत्तप्रसादने धरणात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. मात्र, त्याने हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणातून उचलले, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र काही दिवसांपूर्वी त्याच्या आईचे निधन झाले होते. त्यामुळे तो दुखी झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे गवस कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तरूण वयात हे टोकाचे पाऊल उचलले याबाबत पिकुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. दोडामार्ग पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. धरणाच्या ठिकाणी पाटंबारे विभाग अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित होते.


















1.jpg)





































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.