ठाणे (प्रतिनिधी) - ठाण्याच्या कोपरी परिसरात मिरा-भाईंदर परिवहन बसच्या चालकाला ६ ते ७ जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली. बसवाहक अंकुश रामचंद्र भोते (३२) यांनी मारहाणीच्या विरोधात कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
मिरा भाईंदर ते ठाणे डेपो दरम्यान धावणाऱ्या बसमध्ये चालक शंकर चव्हाण व वाहक भोते कर्तव्यावर होते. गायमुख परिसरात एका स्कूटी चालकाने बसला कट मारल्याने वाद झाला. त्यानंतर संबंधित स्कूटी चालकाने आनंदनगर परिसरात बस अडवून पुन्हा वाद घातला व इतर साथीदारांना बोलावले. कोपरी डेपो येथे बस पोहोचताच ६ ते ७ जणांनी बसमध्ये घुसून चालक चव्हाण यांना लाकडी दांडक्यांनी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. “ड्रायव्हरला ठार मारा” अशा आरोळ्या देत त्यांना बसबाहेर ओढून नेले. या हल्ल्यात चव्हाण जखमी होऊन बेशुद्ध पडल्याने उपचारार्थ ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच वाहक भोते यांनाही मारहाण करून त्यांचे बुकिंग मशीन फोडण्यात आले. ही घटना बसमधील सीसीटीव्हीत कैद झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास कोपरी पोलिस करत आहेत.


















1.jpg)





































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.