loader
Breaking News
Breaking News
Foto

११ रोजी कोष्टी समाज भवन सावर्डे वहाळ फाटा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

आबलोली (संदेश कदम) - देवांग कोष्टी समाज सेवा मंडळ रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळाचे अध्यक्ष गजानन गणपत लोकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवार दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०: ०० ते दुपारी ०१:०० या वेळेत सावर्डे येथील देवांग कोष्टी समाज भवन येथे भव्य दिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य दिव्य रक्तदान शिबिर स्तुत्य उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यातील कोष्टी समाजाने आयोजित केलेला आहे. तरी या भव्य दिव्य रक्तदान शिबिरात रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांनी बहुसंख्येने सहभागी होऊन रक्तदान हेच श्रेष्ठ दान करून अनेकांना जीवन दान द्यावे असे जाहीर आवाहन देवांग कोष्टी समाज सेवा मंडळ रत्नागिरी या मंडळाचे सचिव अरविंद भंडारी मो.नं.९३५६९८६४१९/९८८१५२०५७६ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सामाजिक स्तुत्य उपक्रमासाठी विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट डेरवण रुग्णालय यांचे मौलिक सहकार्य लाभणार असून समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि समाजात रक्तदानाची जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य दिव्य रक्तदान शिबिरात मोफत आरोग्य तपासणी करून रक्तदात्यांना प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे. तसेच उपस्थित सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या भव्य दिव्य रक्तदान शिबिरात रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन देवांग कोष्टी समाज सेवा मंडळ रत्नागिरी या मंडळाचे सचिव अरविंद भंडारी मो. नं.९३५६९८६४१९/९८८१५२०५७६ यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg