loader
Breaking News
Breaking News
Foto

भगवती किल्ल्याजवळ आढळला बेपत्ता युवकाचा मृतदेह

रत्नागिरी - तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह भगवती किल्ल्याजवळील शिवसृष्टीच्या पाठीमागील समुद्र किनारी लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान रेलिंगच्या बाहेरील बाजूस समुद्रकिनारी हा मृतदेह लागलेला नागरिकांना आढळला. तसेच या युवकाची गाडी तशीच असून गाडीला चावी ही लावलेली होती. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार अमोल किडये, राहणार मांडवी हा गेले तीन दिवस आपल्या राहत्या घरातून बेपत्ता होता. त्याचा मृतदेह भगवती किल्ल्‌याच्या येथील शिवसृष्टीच्या पाठी मागील समुद्र किनारी आढळून आला. दरम्यान नागरिकांनी त्याचा मृतदेह समुद्रातून बाहेर रोपवेच्या आधारे काढला. त्याची आत्महत्या की घातपात? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg