रत्नागिरी - रत्नागिरीतील प्रसिद्ध श्रीराम मंदिरामध्ये शनिवारी ११ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वा. श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टाच्यावतीने ज्येष्ठ नागरिक बंधु-भगिनींची विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेमध्ये ज्येष्ठ नागरिक बंधु-भगिनींसाठी प्रसिद्ध डॉ. मतिन परकार हे आरोग्याविषयी मार्गदर्शन करणार आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक बंधु-भगिनींचे वाढदिवसदेखील साजरे करण्यात येणार आहेत. ‘या सभेला रत्नागिरी शहर व तालुक्यातील सर्व ज्येष्ठ बंधू भगिनींनी आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.‘श्रीराम मंदिर ज्येष्ठ नागरिक कट्टा’च्या वतीने प्रत्येक महिन्यात ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींसाठी नामवंत तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करण्यात येते.
शनिवारी ११ एप्रिलला सायंकाळी ४ वा. होणार्या या सभेत रत्नागिरीतील नामवंत डॉक्टर व सुप्रसिध्द परकार हॉस्पिटलचे संचालक डॉ. मतिन परकार हे ज्येष्ठ बंधु भगिनींना आरोग्य विषयक मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. मतिन परकार हे कोकणातील एक नामवंत डॉक्टर म्हणून सुपरिचित आहेत. यावेळी रत्नागिरीतील सुप्रसिध्द बालरोगतज्ज्ञ डॉ. शरद प्रभुदेसाई यांच्या पुस्तकाचे जाहीर प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. तसेच मार्च व एप्रिल महिन्यात वाढदिवस असणार्या ज्येष्ठ बंधु भगिनींचे वाढदिवस देखील यावेळी जाहीरपणे साजरे करण्यात येतील. त्यांच्यासाठी प्रभू श्रीरामाला गार्हाणे घालण्यात येईल व त्यांना शुभेच्छा पत्र देऊन जाहीर शुभेच्छा व्यक्त करण्यात येतील.
तरी रत्नागिरी शहर व तालुक्यातील सर्व ज्येष्ठ बंधु भगिनींनी आवर्जुन या बैठकीला उपस्थित रहावे व नामवंत तज्ज्ञ डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ‘ज्येष्ठ नागरिक कट्टा’चे श्री. सुरेश तथा अण्णा लिमये, श्री. नित्यानंद दळवी, श्री. विनायक हातखंबकर सर, श्री. रमाकांत पांचाळ सर, श्री. संदीप डोंगरे, श्री. नंदकुमार बिर्जे व श्री. राजाराम सुर्वे यांनी केले आहे.


















1.jpg)





































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.