loader
Breaking News
Breaking News
Foto

मदतीच्या बहाण्याने दोघा लुटारूंनी केला जीवघेणा हल्ला

पनवेल :- मदतीचा बहाणा करून दोघा लुटारूंनी एका व्यक्तीला निर्जनस्थळी नेऊन, त्यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करून त्याला लुटल्याची खळबळजनक घटना पनवेलमधील टेंभुर्डे गावाजवळ घडली. या हल्ल्यात सदर व्यक्ती गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणातील दोघा लुटारूंविरोधात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव गौतम मल्हारी हाके असे असून, ते पुण्यात राहण्यास आहेत. हाके हे सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास रेल्वे पटरीच्या बाजूने, टेंभुर्डे गाव परिसरातून जात होते. या वेळी तिथे उभ्या असलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले. त्यातील एका व्यक्तीने माझ्या भावाला चक्कर आली आहे, त्याला मदतीची गरज आहे, असे सांगून हाके यांना झाडाझुडपांच्या आडोशाला नेले. हाके मदतीसाठी पुढे गेले असता, त्यातील एकाने हाके यांना पाठीमागून पकडेल. त्यानंतर दुसऱ्या आरोपीने त्यांच्या खिशातील 2400 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यामुळे हाके यांनी प्रतिकार केला असता, आरोपींनी त्यांच्याजवळ असलेल्या लहान चाकूने हाके यांच्या उजव्या हातावर आणि छातीच्या डाव्या बाजूला वार करून त्यांना गंभीर जखमी केले व तेथून पळ काढला. या घटनेनंतर जखमी हाके यांना तातडीने एम.जी.एम. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर खांदेश्वर पोलिसांनी स्वतः रुग्णालयात जाऊन हाके यांचा जबाब नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आली आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg