loader
Breaking News
Breaking News
Foto

अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम

रसायनी (राकेश खराडे) - रसायनी पाताळगंगा येथील रिलायन्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे सुपुत्र उद्योगपती अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त पाताळगंगा रिलायन्स फाउंडेशनच्यावतीने रसायनी पाताळगंगा परिसरात गुरुवार दिनांक 9 एप्रिल पासून तीन दिवस विविध सामाजिक, धार्मिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. गुरुवारी पाताळगंगा रिलायन्स कंपनीतील म्हसोबा मंदिरात अभिषेक,मंत्रजप करुन व्यवस्थापनाकडून अनंत अंबानी यांना दिर्घायुष्य लाभो असे हात जोडून साकडे घातले.यानंतर दुपारी कैरे आदीवासी वाडीतील 45 कुटूंबांना, बोरीवली वाडीतील 17 तसेच आसपासच्या वाड्यातील असे 217 कुटुंबांना महिनाभर पुरेल इतके किराणा सामानाचे किट रसायनी पाताळगंगा व नागोठणे रिलायन्सचे ग्रुप प्रेसिडेंट अविनाश श्रीखंडे,साईड प्रेसिडेंट सु़ंदररंजन रंगराजन एचआर हेड थाॅमस ईंसो,विशाल गडाख,फायबर प्रेसिडेंट पंकज यादव,कार्पोरेट अफेअर्सचे संतोष विचारे, सुमित बरमण आदींचा हस्ते वाटप करण्यात आले, यावेळी माजी सरपंच अविनाश पाटील,माजी सरपंच अशोक मुंढे, नंदकुमार पाटील उपस्थित होते.वाटपप्रसंगी अविनाश श्रीखंडे यांनी सदर वाड्यांना लगातार सहा महिने किराणा सामानाचे किट वाटप करणार असल्याचे सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त लोधिवली टाऊनशिप मंदिरात दिवसभर मंत्रजप सुरू होते.सायंकाळी लोधिवली व बोरीवली मंदिरात संगीत भजन व ग्रामस्थ भजनाचा कार्यक्रम झाला.परिसरात मिठाई वाटप करण्यात आली.रात्री लोधिवली टाऊनशिपमध्ये कलात्मक कार्यक्रम होवून कामगार कुटुंबाला अन्नदान करण्यात आले.यावेळी रिलायन्स पाताळगंगा व्यवस्थापनाकडून केक कापून अनंत अंबानी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. शुक्रवार दि.10 रोजी रसायनी पाताळगंगा परिसरातील आठ जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे किट वाटप करण्यात आले.तसेच कंपनीलगतच्या एमआयडीसी परिसरात विविध जातींच्या 3100 वृक्षांची लागवड करण्यात आली.या वृक्षांचे संवर्धन रिलायन्स इंडस्ट्रीज पाताळगंगाकडून करण्यात येणार आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg