रत्नागिरी: जगप्रसिद्ध टाटा आयपीएल २०२६ चा उत्साह आता थेट रत्नागिरीकरांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. यंदाचे आयपीएल पूर्वीपेक्षा अधिक भव्य आणि रंजक होणार असून, रत्नागिरीतील क्रिकेट चाहत्यांना मैदानावरचा अनुभव देण्यासाठी ‘आयपीएल फॅन पार्क’चे आयोजन करण्यात येणार आहे. बीसीसीआयचे प्रतिनिधी अनंत दातार यांनी रत्नागिरीत आयोजित एका पत्रकार परिषदेत ही महत्त्वाची माहिती दिली. यावेळी रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी बिपिन बंदरकर, दीपक देसाई आणि असोसिएशनचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
अनंत दातार यांनी सांगितले की, यंदा देशभरातील ५० शहरांमध्ये फॅन पार्क्स उभारले जात असून, त्यात रत्नागिरीचा समावेश असणे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या फॅन पार्कचे मुख्य आकर्षण म्हणजे तेथील भव्य पडदे, ज्यावर सामन्यातील प्रत्येक थरारक क्षण थेट प्रक्षेपित केला जाईल. यामुळे प्रेक्षकांना आपण प्रत्यक्ष स्टेडियममध्ये बसून सामना पाहत असल्याचा अनुभव येईल. विशेष म्हणजे, या फॅन पार्कमध्ये प्रवेश पूर्णपणे विनामूल्य असून सर्व वयोगटातील चाहत्यांसाठी हे एक पर्वणीच ठरणार आहे. केवळ क्रिकेटच नव्हे, तर चाहत्यांच्या मनोरंजनासाठी येथे अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत. यामध्ये फेस पेंटिंग, शिट्ट्या, चीअरिंग आणि 'क्रेझी स्टंट्स' अशा विविध गोष्टींचा समावेश असेल. आयपीएलच्या अधिकृत प्रायोजकांतर्फे येथे संगीत, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि शीतपेयांची व्यवस्थाही करण्यात येणार आहे, ज्यामुळे उत्सवाचा आनंद द्विगुणित होईल. यंदा देशभरातील फॅन पार्क्समध्ये १० लाखांहून अधिक क्रिकेटप्रेमी उपस्थित राहतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
रत्नागिरीतील चाहत्यांना आपल्या आवडत्या संघाला आणि खेळाडूंना दाद देण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. सीमारेषेवरील चौकार-षटकार, हॅट्ट्रिक्स आणि फिरकीची जादू प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी क्रिकेटप्रेमींमध्ये आतापासूनच मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. जिल्हा क्रिकेट असोसिएशनने या आयोजनासाठी कंबर कसली असून, जास्तीत जास्त चाहत्यांनी आपल्या फॅन पार्कमध्ये उपस्थित राहून या क्रिकेट उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शहरात लवकरच या भव्य फॅन पार्कची ‘काउंटडाउन’ सुरू होणार असून सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे.































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.