loader
Breaking News
Breaking News
Foto

खासदार नारायण राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या शुभेच्छा

कणकवली (प्रतिनिधी)- राज्याचे माजी मुख्यमंत्री खास. नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री आशिष शेलार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, हे कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी दाखल झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत एकाच विमानातून ही नेतेमंडळी चीपी विमानतळ येथे पोचली. मंत्री नितेश राणे यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले व कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी ही सर्व नेते मंडळी दाखल झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास. नारायण राणे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी निलमताई राणे, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, आम. निलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व अन्य उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg