रत्नागिरी : बृहन मुंबई विज्ञान शिक्षक संघटनेने आयोजित केलेल्या सुप्रसिध्द डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये रत्नागिरीच्या फाटक हायस्कूलची इयत्ता 6 वीची विद्यार्थिनी कु. स्पृहा तेजराज भावे रत्नागिरी जिल्ह्यामधून एकमेव सुवर्णपदक विजेती ठरली असून सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहराने याची दखल घेऊन शहर मंडळाच्यावतीने स्पृहाचा सत्कार करण्यात आला.
बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाने आयोजित केलेल्या 'डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा 2025 - 2026' या अभिमानास्पद उपक्रमात यावर्षी एक लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ही स्पर्धा - १.लेखी, २.प्रात्यक्षिक, ३.कृती संशोधन अहवाल आणि ४.मुलाखत अशा चार टप्प्यांमध्ये घेतली जाते. यंदाच्या स्पर्धेची थीम पृथ्वी प्रणाली आणि मानवी कृती (हस्तक्षेप) असा दिला आहे .या विषयावर माणसाच्या हस्तक्षेपामुळे नैसर्गिक संपत्तीमध्ये कसे परिणाम होतात याबाबतचा प्रकल्प सादर करावयाचा होता. कु. स्पृहा भावे हिने “शाश्वत शेती आंब्याची दिशा कोकणच्या विकासाची” असे घोषवाक्य घेऊन कोकणातील नगदी पीक आंबा, त्याची सध्याची परिस्थिती, रासायनिक खते, औषधे याचे दुष्परिणाम, पीकाचे कमी होणार उत्पादन आणि त्याबरोबर सेंद्रिय आणि नैसर्गिक पध्दतीनेच आंबा पीकाची देखभाल करणे कसे फायद्याचे होऊ शकेल व त्याबाबतची उपाय योजना याविषयीचा प्रकल्प अहवाल सादर केला होता. सन 2025 - 2026 च्या स्पर्धेमध्ये या सर्व स्पर्धा प्रक्रियेमधून भाग घेऊन फाटक हायस्कूलच्या कु. स्पृहा तेजराज भावे या विद्यार्थिनीला मुंबई येथे झालेल्या पुरस्कार वितरण समारंभामध्ये कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, सरंक्षण मंत्रालयातील निवृत्त डी. आर. डी. ओ. सह संचालक मा. डॉ. ए. जी. नगरकर यांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. कु. स्पृहा तेजराज भावे रत्नागिरी जिल्ह्यामधील सुवर्णपदकाची एकमेव मानकरी ठरली. याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी हा एक अभिमानस्पद प्रसंग असल्याची प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातील नामवंत व्यक्त करीत आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलेल्या सत्कार शुभेच्छा समारंभ प्रसंगी भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे, संदीप सुर्वे, निलेश आखाडे, जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, जिल्हा पदाधिकारी शेखर लेले, राजेंद्र पटवर्धन, राजन फाळके, शैलेश बेर्डे, सायली बेर्डे, प्रज्ञा टाकळे, शोभा शिरोळे, सारिका शर्मा, डॉ मुक्ता बाष्टे, विजय माळवदे, प्रसाद बाष्टे, संदीप मांडवकर आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)


















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.