पुणे :अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या काही महिन्यांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी आणि संघर्ष उघडपणे समोर येऊ लागला आहे. सुनेत्रा पवार यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतर संघटनेत मोठे बदल करण्यात आले. मात्र, नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीमुळे पक्षातील अनेक वरिष्ठ नेते नाराज असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. यात पार्थ पवार किंगमेकर ठरताहेत , असे राजकीय तज्ञांचे मत आहे .
विशेषतः प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांसारख्या अनुभवी नेत्यांना प्रमुख पदांपासून दूर ठेवण्यात आल्याने पक्षात अस्वस्थता वाढल्याचे बोलले जात आहे. हा संपूर्ण वाद आता थेट शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.
पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या नव्या यादीत सुनेत्रा पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. तसेच पार्थ पवार आणि जय पवार यांची जनरल सेक्रेटरी म्हणून नोंद करण्यात आली आहे. मात्र, खासदार सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे प्रफुल पटेल आणि छगन भुजबळ यांनाही महत्त्वाच्या पदांपासून दूर ठेवण्यात आल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.



















































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.