loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात फॉरेक्स ट्रेडिंगच्या आमिषाने फसवणूक

ठाणे (प्रतिनिधी) - ठाण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिकाची ऑनलाईन गुंतवणुकीत मोठा नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत तब्बल ९३ लाख ३० हजार २०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात भामटे यशस्वी झाल्याचे प्रकरण प्रकाश झोतात आलेले आहे. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात अज्ञात मुकुल अग्रवाल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लुईसवाडी येथील सचिन प्रताप साळुंखे(४४) याना जानेवारी २०२६ मध्ये फेसबुकवर अनन्या अग्रवाल या महिलेने साळुंखे याना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. फेसबुकवर मैत्री झाल्यानंतर तिने फॉरेक्स ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळत असल्याचे सांगत एक लिंक पाठवली. त्यानंतर मुकुल अग्रवाल नावाच्या व्यक्तीनेही त्यांना ट्रेडिंगचे प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडले. सुरुवातीला कमी गुंतवणुकीवर नफा दाखवून विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर कमिशन, व्हेरिफिकेशन फी, सेबी शुल्क अशा विविध कारणांनी त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळण्यात आले. अॅपवर तब्बल ३ कोटी रुपयांचा कृत्रिम नफा दाखवला. मात्र पैसे काढण्याचा प्रयत्न करताच फसवणूक झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg