loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा तालुक्यातील खंडीत झालेला विज पुरवठा पूर्वपदावर

लांजा (वार्ताहर) - अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे व सोसाट्याच्या वार्‍यामुळे लांजा तालुक्यातील खंडीत झालेला विज पुरवठा पूर्वपदावर आला आहे. विज पुरवठा सुरळीत करण्यास थोडा कालावधी निश्चित लागला असला तरी प्रतिकूल परिस्थितीत शंभर टक्के ग्राहकांपर्यंत विज पुरवठा सुरळीत करण्यात आला असल्याची माहिती लांजा महावितरणचे उपकार्यकारी अभियंता संतोष चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी विभागाचे अतिरीक्त कार्यकारी अभीयंता सुयोग पाटणकर यांनी घटनास्थळी उपस्थित राहून विद्युत पुरवठा खंडित झालेल्या ठिकाणचा आढावा घेतला. या उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीत कोकण परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये, रत्नागिरी मंडळाच ेअधीक्षक अभियंता सुनिलकुमार माने आणि रत्नागिरी विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र फुलपगारे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच विद्युत प्रवाह पूर्ववत करण्यासाठी आवश्यक मनुष्य बळ आणि यंत्र सामुग्री, साहीत्य त्यांचेकडून उपलब्ध करून देण्यात आले. लांजा, राजापूर, साखरपा मतदार संघाचे आमदार किरण उर्फ (भैय्या) सामंत यांनी विद्यतु पुरवठा खंडीत झालेल्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन कर्मचार्‍यांना सुरक्षितेची काळजी घेत ग्राहकांचा विद्यतु पुरवठा सुरळीत करणेसंदर्भात मार्गदर्शन केले. महावितरणाच्या नुकसानीचा आकडा मोठा असता अनेक दुर्गम भागात मोठी हानी झाली असताना देखील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विद्युत पुरवठा सुरळीत केल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg